
कऱ्हाड : शहरातील चौकाचौकांत, काही मोक्याच्या ठिकाणी विविध नेत्यांचे वाढदिवस, निवड-नियुक्तीनंतर अभिनंदनाचे, धार्मिक कार्यक्रम, नेत्यांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे फ्लेक्स, बॅनर लावले आहेत. आगामी निवडणुकींच्या दृष्टीने शहरात फ्लेक्स, बॅनरची संख्या वाढली आहे. त्यावर पालिकेने आज कारवाईचा बडगा उगारला. अनधिकृत फ्लेक्स, बॅनर कर्मचाऱ्यांनी हटविले. मात्र, कारवाई करताना पालिकेने दुजाभाव केल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. राजकीय व्यक्तींचे फ्लेक्स, तसेच ठेवल्याने नागरिकांत चर्चा आहे. दरम्यान, कारवाईत पालिकेने शंभरहून अधिक फ्लेक्स, बॅनर जप्त केले.