प्रशासकीय इमारतीत दोन डोस न घेतलेल्यांना प्रवेश नाकारला

Omicron Virus
Omicron Virusesakal
Summary

ओमिक्रॉनच्या नवीन संसर्गाचा विचार करुन प्रशासनानं काही निर्बंध घातले आहेत.

कऱ्हाड (सातारा) : कोरोनानंतर (Coronavirus) ओमिक्रॉनच्या (Omicron Virus) नवीन संसर्गाचा विचार करुन जिल्हा प्रशासनानं काही निर्बंध घातले आहेत. त्यामध्ये सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, हॉटेल, व्यावसायिक, मॉल, समारंभ, संमेलन, मेळावे या ठिकाणी दोन लसीचे डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी आज सोमवारपासून कऱ्हाड (जि. सातारा) येथील प्रशासकीय इमारतीतील सरकारी कार्यालयात करण्यात आली. तिथे अनेकांनी दोन डोस न घेतल्याने त्यांना काम न होता रिकाम्या हातानेच परतावे लागले.

कऱ्हाड तालुक्यातील (Karad Municipality) सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, हॉटेलचे चालक-मालक, व्यावसायिक, मॉलचे चालक आदींची बैठक प्रांताधिकारी उत्तम दिघे आणि तहसीलदार विजय पवार यांनी घेतली होती. त्यामध्ये पोलिस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील (Ranjit Patil), वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे (Shashikant Shinde), पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, मलकापूरचे मुख्याधिकारी, बांधकाम, महावितरण, उत्पादन शुल्क विभागासह सर्व शासकीय कार्यालयांचे अधिकारी, प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत काही आदेश देण्यात आले होते.

Omicron Virus
शरद पवारांचा रामराजेंना फोन अन् अध्यक्षपदाची माळ पाटलांच्या गळ्यात

त्यामध्ये पालिका, ग्रामपंचायत (Gram Panchayat), पंचायत समितीने शासकीय, निमशासकीय कार्यालये, हॉटेल, व्यावसायिक, मॉल, समारंभ, संमेलन, मेळावे या ठिकाणी दोन लसीचे डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्यात येईल याची जनजागृती घंटागाड्यांच्या माध्यमातून करावी. या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी महसूल विभाग, पोलिस अधिकारी, गटविकास अधिकारी, पालिका, स्थानिक स्वराज्य संस्था संबंधित प्रशासकीय विभाग यांनी करावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्याची अंमलबजावणी आजपासून येथील प्रशासकीय इमारीत प्रवेश घेण्यासाठी करण्यात आली. तेथे दारावरच दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, मेसेज दाखवल्यानंतरच आत सोडण्यात येत होते. त्यामुळे ज्यांनी दोन डोस घेतले नाहीत, त्यांची पंचाईत झाली. त्यांना नाईलाजाने रिकाम्या हाताने घरी परतावे लागले.

Omicron Virus
शिवेंद्रसिंहराजेंनी मनाचा मोठेपणा दाखवला : रामराजे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com