

Satara Karad Murder Case Youth Murdered After Suspected Mother Relationship Son And Friend Detained With Sickle And Car Now
esakal
-राजेंद्र ननावरे
मलाकपूर (कऱ्हाड): आईशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एकाचा काल रात्री उशिरा निघृण खून झाला. खून झालेला युवक चाफळ (ता. पाटण) येथील आहे. सुनिल नाथा चव्हाण (रा. चाफळ) असे त्याचे नाव आहे. त्याच्या खून प्रकरणी सूरज दिपक चव्हाण (रा. चाफळ) व त्याचा मित्र अक्षय सुरेश म्हेत्रे (रा. कोरेगाव, ता. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.