
Pawar family in Karhad donates memorial day funds to flood-affected families, demonstrating strong social responsibility.
Sakal
कऱ्हाड: सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. गावागावांत पुराचे पाणी घुसले, शेकडो घरं पाण्याखाली गेली आणि असंख्य कुटुंबांच्या आयुष्यावर संकट कोसळले. या दुःखातून सावरून पुन्हा नव्याने कुटुंबे उभी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्या दाहक वेदनेचे वास्तव समोर आल्यावर येथील प्रकाश ऊर्फ नरेंद्र पवार आणि विनायक पवार यांनी त्यांचे मोठे बंधू, तर आविष्कार यांचे वडील (कै.) विलास पवार यांचा दुसरा स्मृतिदिन साधेपणाने करत २१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. पवार कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.