कोल्हापूर नाक्‍यावरील चाेरी तासाभरातच उघडकीस

हेमंत पवार
Sunday, 17 January 2021

शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली चाेरीचा तपास करण्यात आला.

कऱ्हाड : कोल्हापूर नाक्‍यावरील एका कॉम्प्लेक्‍समधील ऍटो एजन्सीसह शेजारील पान शॉप चोरट्यांनी फोडले. दुकानातील अडीच हजारांची रोकड, टॅब व पान शॉपमधील मोबाईल चार्जर चोरट्यांनी पळवला. त्याबाबतची तक्रार क्षितीज राजेंद्र शहा (रा. कल्याणी कॉलनी, शनिवार पेठ, कऱ्हाड) यांनी दिली होती. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर तासाभरात गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अल्पवयीन चोरट्यास पकडून त्याच्याकडून रोख रक्कम व मुद्देमाल जप्त केल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
 
पोलिसांची माहिती अशी - क्षितीज शहा यांचे संजय एजन्सीज नावाचे दुकान कोल्हापूर नाक्‍यावर आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. आतील अडीच हजारांची रोकड, सॅमसंग कंपनीचा टॅब असा सुमारे वीस हजारांचा मुद्देमाल गायब केला. त्याच परिसरातील बापूराव बाजीराव पाटील यांच्या मालकीचे पान शॉप फोडून चोरट्यांनी मोबाईल चार्जर पळवला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून तपास सुरू केला. 

जालन्यातील अपहरणकर्त्याची साताऱ्यात सुटका; काेल्हापूर, सांगली, साेलापूरच्या युवकांना अटक

शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार राजेंद्र पुजारी, सतीश जाधव, नितीन येळवे, जयसिंग राजगे, संजय जाधव, सचिन साळुंखे, मारुती लाटणे, विनोद माने, प्रफुल्ल गाडे, तानाजी शिंदे, आनंदा जाधव यांनी केवळ एका तासात अल्पवयीन चोरट्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीतील मुद्देमाल व रोख रक्कम पोलिसांनी जप्त केला आहे.

मुंबई, पुणे, काेल्हापूरहून साता-याला येताय! त्यापुर्वी हे वाचा

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad Police Investigated Theft Case Of Kolhapur Naka Satara Crime News