

Big Breakthrough: Karad Police Recover ₹35 Lakh in Robbery Case
sakal
कऱ्हाड : जयसिंगपूर (जि. कोल्हापुर) येथील पेपरविक्री व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला पुणे-बंगळूर महामार्गावरील नांदलापूरजवळ (ता. कऱ्हाड) लाकडी दांडके व चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या पाच जणांना तालुका पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा व पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाने पुण्यातून अटक केली. संशयिताकडून पिस्तूल, चाकू व लुटलेला मुद्देमाल असा सुमारे ३५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.