
कऱ्हाड: शहर पोलिसांनी आगामी गणेशोत्सव, दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांची आज झाडाझडती घेतली. यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या अनेकांना पोलिसांनी तंबी दिली. सुमारे ३० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. उत्सव कालावधीत गुन्हा घडल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी दिला.