
कऱ्हाड : केंद्र सरकारतर्फे राबवण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये येथील पालिकेने देशाच्या पश्चिम विभागात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. स्पर्धेचा निकाल आज जाहीर झाला. कऱ्हाड पालिकेने सलग सहाव्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. त्याबद्दल अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी आनंद व्यक्त केला. गुरुवारी (ता. १७) दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. त्याबाबतचे पत्र पालिकेला आज प्राप्त झाले.