Karad News : भरसभेतचं शशिकांत शिंदेंनी ओळखली उदयसिंह उंडाळकरांची ताकद

रयत संघटनेची ताकद अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्यासोबत आहे. विलासकाकांच्या नंतर आज अ‍ॅड. उंडाळकर यांची ताकद काय आहे हे महाविकास आघाडीला कळलेले आहे.
shashikant shinde and udaysinh undalkar
shashikant shinde and udaysinh undalkarsakal

कऱ्हाड - रयत संघटनेची ताकद अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्यासोबत आहे. विलासकाकांच्या नंतर आज अ‍ॅड. उंडाळकर यांची ताकद काय आहे हे महाविकास आघाडीला कळलेले आहे. जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात जे-जे करायची वेळ येईल त्यावेळी मी तुमच्यामागे उभा राहीन. रयत संघनेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या. त्या पुर्ण करुन महाविकास खासदार झाल्यानंतर रयत संघटनेच्या बाबतीत महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याची जबाबदारी शशिकांत शिंदेची राहिल असा शब्द देतो, अशी स्पष्टोक्ती महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार शिंदे यांनी आज येथे केली.

रयत संघटनेच्या माध्यमातुन आमदार शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजीत केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. अ‍ॅड. उंडाळकर, मनोहर शिंदे, वसंतराव जगदाळे, एम. जी. थोरात, मजहर कागदी, अ‍ॅड. मुलानी, प्रा. धनाजी काटकर, फरीदा इनामदार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

निवडणुकीला सामोरे जाताना संकटे आणण्याचा प्रयत्न सुरु आहेत असे सांगुण आमदार शिंदे म्हणाले, रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परखड मते व्यक्त केली. विलासकाकांच्या नंतर आज अ‍ॅड. उंडाळकर यांची ताकद काय आहे हे महाविकास आघाडीला कळलेले आहे. जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात जे-जे करायची वेळ येईल त्यावेळी मी तुमच्यामागे उभा राहीन. मी उपकाराची जाणीव ठेवणारा आहे.

कोणतेही संकट आले तरी मी घाबरत नाही. मात्र गेल्या चार महिन्यापासुन जिल्ह्यातील काही लोकांनी मुद्दामहुन माझ्याविरोधात षडयंत्र सुरु केले आहे. आवाज दाबण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे. मात्र आवाज दाबाल मात्र विचार दाबु शकणार नाही. आजची लढाई देशाची, राज्याचे भवितव्य ठरवणारी आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणुन मी निवडुण येणार आहे. मात्र निवडुण आल्यावर निधी वाटप करताना दुजाभा केला जाणार नाही.

अ‍ॅड. उंडाळकर म्हणाले, सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जाणारी रयत संघटना आहे. या संघटनेला मोडकळीस आणण्याचे प्रयत्न २००९ पासुन सुरु झाले. त्यांना व्यक्तीगत अडचणीत आणण्याचे काम ज्यांनी केले तेच आज प्रतिगामी विचारधारेच्या लोकांच्याबरोबर जावुन काम करत आहे हे तुम्ही लक्षात ठेवावे. मात्र संघटनेच्या ताकदीवर विलासकाकांनी ते प्रयत्न मोडुन काढले.

मात्र ती प्रतिगामी लोक जर तुमच्याबरोबर बसुन काम करणार असतील तर संघटनेला पुढेजावुन काहीतरी विचार करावा लागेल. काकांनी आयुष्यभर कॉंग्रेसच्या विचार धारेची पाठराखण केली. सर्वसामान्यांना सत्तेत संधी देवुन सत्तेचे विकेंद्रीकरण केले. शशिकांत शिंदे हे कऱ्हाडमधुन मोठ्या मताधिक्याने निवडुन येतील. मनोहर शिंदे, प्रा. काटकर, श्री. कागदी व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रदीप पाटील यांनी आभार मानले.

अ‍ॅड. उंडाळकरांना महाविकासची ऑफऱ होती

महाविकास आघाडीमधुन अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनाही लोकसभेसाठी ऑफर होती. खासदार शरद पवार यांच्याकडेही त्यांचे नाव गेले होते. मात्र त्यांनीच जो उमेदवार द्याल त्याला मोठ्या मताधिक्याने निवडुण आणायची जबाबदारी आमची आहे असे सांगुण उमेदवारी घेण्याची टाळल्याचे स्पष्टोक्ती आमदार शशिकांत शिंदे यांनी आज केली. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com