
-मुकुंद भट
ओगलेवाडी : पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या रेल्वे डेमो प्रवासी गाडीच्या (क्र. ११४२५) इंजिनजवळील ॲक्सल बॉक्सला कऱ्हाड रेल्वे स्थानकात आग लागण्याची घटना घडली. त्यामुळे प्रवाशांची भीतीने गाडीतून उतरण्याची एकच धावपळ उडाली. सुदैवाने या घटनेत एकही प्रवासी जखमी झाला नाही.