

Karad taluka hospital where the doctor allegedly misbehaved with the woman patient during examination.
Sakal
कऱ्हाड : येथील विमानतळ परिसरातील एका गावातील आजारी महिला दवाखान्यात गेल्यानंतर तिच्याशी डॉक्टरने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार आज घडला. याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी दुपारी संतप्त ग्रामस्थांनी संबंधित डॉक्टरला बेदम चोप देऊन त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. याप्रकरणी डॉ. अल्ताफ हुसेन उस्मानसा नदाफ (रा. कऱ्हाड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.