
कऱ्हाड : राजकीय विषयावर चर्चा सुरू असतानाच युवकावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना विजयनगर येथे घडली. रविवारी रात्री झालेल्या या घटनेची काल रात्री उशिरा पोलिसात नोंद झाली. संबंधित युवकाच्या डोक्यात, पाठीवर, हातावर वार झाल्याने युवक गंभीर जखमी आहे. पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल आहे. रोहन हनुमंत ताटे (वय ३१, रा. मुंढे) असे जखमीचे नाव आहे. सागर तानाजी चव्हाण (रा. विजयनगर) व त्याच्या दोन मित्रांवर (नाव समजू शकली नाहीत.) गुन्हा नोंद झाला आहे.