शेंद्रे ते कागल सहापदरीकरणासाठी सेनेच्या कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

शेंद्रे ते कागल सहापदरीकरणासाठी सेनेच्या कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

मलकापूर (जि.सातारा) : कोल्हापूर नाक्‍यावर वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन काशीद यांचा अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी तीन नोव्हेंबर रोजी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन येथील उड्डाणपुलाच्या कामाबाबत व शेंद्रे ते कागल सहापदरीकरण योजनेच्या विलंबाबाबत पत्रव्यवहार केला होता.
अखेरच्या श्वासपर्यंत विलासराव पाटील उंडाळकरांनी जपला स्वयंभू बाणा

त्यामध्ये म्हटले आहे, की 2016- 17 पासून शेंद्रे ते कागल सहापदरीकरण योजनेबाबत वारंवार निविदा प्रसिद्ध झाल्या; परंतु आजअखेर सदर प्रकल्पाचे काम मार्गी लागले नाही. सदर शेंद्रे ते कागल महामार्ग चौपदरीकरण 2003 मधील योजनेत अनेक त्रुटी असून, प्रामुख्याने कऱ्हाड शहरातील कोल्हापूर नाका येथील एकेरी उड्डाणपुलाजवळ प्रचंड अपघाताचे क्षेत्र निर्माण झाले आहे, तसेच विविध ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र निर्माण झालेली आहेत. यात प्रामुख्याने स्थानिक नागरिकांचा बळी जात असून, जीवितहानी होत आहे. प्रचंड होणारी वाहतूक कोंडी याकरता सहापदरीकरणाची योजना मार्गी लागणे गरजेचे आहे; परंतु आजअखेर या योजनेच्या निविदा वारंवार पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.

ठरलं तर! प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय आठवडाभरात; पृथ्वीराज चव्हाणांचे सूतोवाच  

यामुळे सदर प्रकल्प प्रलंबित आहे, तरी याकामी आपण गांभीर्यपूर्वक लक्ष घालून प्रकल्पाची निविदा काढून सदर योजना मार्गी लावावी. खासदार श्रीनिवास पाटील व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पाठपुरावा करून तातडीने उड्डाणपूल होण्यासाठी लक्ष घालावे, असेही श्री. काशीद यांनी निवेदनात म्हटले आहे.

इरफान खानचं निधन होऊन झाले आठ महिने, या ८ भूमिकांमधून आजही प्रेक्षकांच्या मनात आहे जिवंत

संपादन - सिद्धार्थ लाटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com