esakal | कऱ्हाडला किरकोळ कारणावरून तिघांना लोखंडी गजाने मारहाण I crime
sakal

बोलून बातमी शोधा

crime

कऱ्हाडला किरकोळ कारणावरून तिघांना लोखंडी गजाने मारहाण

sakal_logo
By
(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : किरकोळ कारणावरून पाच जणांनी ट्रक मालकासह तिघांना त्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून लोखंडी गजाने मारहाण केली. शहरातील मार्केट यार्ड गेट क्रमांक एकसमोर काल रात्री उशिरा घटना घडली. साहील आलम मुजावर (वय २४, रा. मंगळवार पेठ) असे जखमीचे नाव आहे. रंगाप्पा नाटेकर (४९), शांताबाई नाटेकर (४५), शरणू नाटेकर (२८), संतोष नाटेकर यांच्यासह अन्य एकावर गुन्हा नोंद आहे.

पोलिसांनी सांगितले की. साहील मुजावरचा ट्रक व्यवसाय आहे. त्याच्या ट्रकवरील चालकास किरकोळ कारणावरून रंगाप्पा नाटेकर याचा वाद झाला.त्या वादातून काल रात्री रंगाप्पाने चालकाला शिविगाळ, दमदाटी केली. त्यानंतर साहील मुजावरसह त्याचा भाऊ आबीद आणि मित्र ओंकार पवार तिघेजण नाटेकरला जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी नाटेकर घरासमोर होता. चालकाला दमदाटी का केली, असे तिघांनी विचारल्यानंतर रंगाप्पासह अन्य पाचजणांनी त्या तिघांच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून लोखंडी गज, लाकडी काठीसह लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात तिघेजण जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हवालदार सुनील पन्हाळे तपास करीत आहेत.

loading image
go to top