esakal | विक्रेत्यांनाे! एका जागी बसून भाजी विकू नका; गुन्हा दाखल हाेईल

बोलून बातमी शोधा

Vegetable Seller

विक्रेत्यांनाे! एका जागी बसून भाजी विकू नका; गुन्हा दाखल हाेईल

sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (जि. सातारा) : शहरातील विभागीय भाजी मंडईची संकल्पना पालिकेने केली होती. तेथेही गर्दी होऊ लागल्याने पालिकेने तीही व्यवस्था मंगळवारी बंद पाडली. मंडईतील विक्रेत्यांना हटविण्यात आले. आजपासून (बुधवार) विक्रेत्यांना शहरात फिरून भाजी विकण्याची सक्ती केली आहे. एका जागी बसून भाजी विकणारा दिसला, की त्याच्यावर कारवाई होणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.

शहरातील मुख्य बाजारपेठ रविवारपासून पालिकेने बंद केली. त्याऐवजी पालिकेने विभागीय भाजी मंडई सुरू केली होती. त्यात सातहून अधिक ठिकाणी भाजी विक्रीची व्यवस्था केली होती. भाजी नागरी वस्तीत पोचविण्याचा प्रयत्न आहे, तरीही खरेदीसाठी झुंबड होऊ लागली. नागरिकही नियम पाळत नव्हते तर विक्रेतेही मास्क व सॅनिटायजरचे नियम पालन नव्हते. त्यामुळे ते विक्रेते सुपर स्प्रेडर ठरत होते. ती धोकायादक स्थिती लक्षात येताच मुख्याधिकाऱ्यांनी विभागीय भाजी विक्री केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते केंद्र बंद करण्यात आली आहेत.

मुख्याधिकारी डाके म्हणाले, ""विभागीय मंडईसाठी केलेले नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्याशिवाय विक्रेता व खरेदीला येणारेही कोणत्याही नियमाचे पालन करत नाहीत. मास्क सक्तीचे असतानाही ते घातले जात नाही. गर्दी न करता खरेदीचे नियमही पाळले गेले नाहीत. त्यामुळे विभागीय भाजी विक्री केंद्र बंद केली आहेत. त्याऐवजी विक्रेत्यांना फिरून भाजी विकण्याची सक्ती केली आहे. त्याची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी पालिकेने शहरातून रिक्षा फिरवून त्याची माहिती दिली आहे. एका जागी भाजी विकताना कोणी दिसल्यास त्यांच्या गुन्हा दाखल केला जाणार आहे.

काळजी मिटली! काेराेनाबाधित मुलांसाठी सिव्हीलला स्वतंत्र वॉर्ड

काेल्हापूर जिल्ह्यातील रुग्णालयाबाबत साता-याच्या जिल्हाधिका-यांची तक्रार, वाचा सविस्तर