
कऱ्हाड: कौटुंबिक वादातून एकाने सावत्र भावाला चाकूने भोसकल्याची घटना गोळेश्वर (ता. कऱ्हाड) येथील दुपटे कॉलनीत काल सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी जखमी राहुल पोपट दुपटे (वय ३४) यांनी याबाबतची फिर्याद दिली असून, त्यावरून दयानंद पोपट दुपटे (वय ४५), आदित्य दयानंद दुपटे (वय २०), शीतल दयानंद दुपटे (वय ३६) यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.