Karad Reservation: कऱ्हाडच्या मात्तबरांना झेडपीसाठी दिलासा; पंचायत समितीत राहणार महिलांचा दबदबा, दुधाची तहान ताकावर भागवण्याची अनेकांवर वेळ

Relief for Karhad Influencers: सह्याद्री कारखान्याचे संचालक नेताजी चव्हाण, भाजपमध्ये प्रवेश केलेले शैलेश चव्हाण यांच्यासह अन्य काही इच्छुकांनी तयारी केली होती. मात्र तो गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने तेथे आता महिलेला संधी मिळणार आहे.
Women leaders in Karhad prepare to take a strong role in Zilla Parishad committees, influencing local governance.

Women leaders in Karhad prepare to take a strong role in Zilla Parishad committees, influencing local governance.

Sakal

Updated on

-हेमंत पवार

कऱ्हाड: कऱ्हाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १२ गटापैकी पाल, उंब्रज, मसुर, तांबवे, येळगाव या पाच गटामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले आरक्षण पडले. त्यामुळे तेथुन निवडुण येणाऱ्या मात्तबरांना दिलासा मिळाला आहे. मात्र कोपर्ड हवेली, वारुंजी, कार्वे, रेठरे बुद्रुक या चार गटात महिला आरक्षण आल्याने मै नही तो पत्नी सही अशी स्थिती इच्छुकांची होणार आहे. त्याचबरोबर पुर्वीपासुन कऱ्हाड दक्षिणमधील राजकीयदृष्टा महत्वाचे असलेल्या काले, सैदापुर, विंग गटातील खुल्या प्रवर्गातील मात्तबरांचा हिरमोड झाला असुन त्यांच्यावर आता दुधाची तहान ताकावर भागवण्याची वेळ येणार आहे. तालुक्यातील सात गण खुल्या प्रवर्गासाठी तर वाघेरी, वारुंजी, सुपने, विंग, कार्वे, रेठरे बुद्रुक, शेरे, कालवडे, येळगाव हे ११ गण सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहेत. तालुक्यातील एकुण २४ पैकी १२ गण हे महिलेसाठी राखीव झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com