

Railway tracks symbolising unfulfilled demand for Karad–Chiplun line as a new project gets central approval.
Sakal
-मुकुंद भट
ओगलेवाडी: नुकत्याच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात पश्चिम महाराष्ट्र- कोकण लाेहमार्गाद्वारे एकमेकांना जोडण्यासाठी कोल्हापूर- वैभववाडी लाेहमार्गास केंद्राने मंजुरी दिली. केंद्र शासनाचा हिस्सा असलेल्या ३४११ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद होणार असल्याने कोल्हापूर - वैभववाडी कामास पुढील वर्षात सुरुवात होणार असल्याचा निर्णय झाला. त्यामुळे गेल्या ३० वर्षांपासून मागणी असलेला कऱ्हाड - चिपळूण लोहमार्ग आता होणार नसल्याने, तसेच अन्य नवीन लोहमार्ग व नवीन गाड्यांचा अर्थसंकल्पात प्रस्ताव नसल्याने भागातील नागरिकांची निराशा झाली.