
Students of Krishna Medical College celebrate after their short film on body donation receives Oscar recognition for its humanitarian message.
Sakal
-हेमंत पवार
कऱ्हाड: कृष्णा विश्व विद्यापीठातील मेडिकल कॉलेजच्या टायसन फर्नांडिस याने ॲनाटॉमी विभागाचे प्रमुख डॉ. एम. पी. अंबाली यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने देहदानावर सामाजिक संदेश देणारा लघुपट तयार केला. ग्रीस येथील इंडिपेंडंट व्हिडिओ फिल्म फेस्टिव्हल ऑफ यूट्यूब आर्ट क्लब पावलोस पराशाकिस या आंतरराष्ट्रीय महोत्सवात ऑर्गन डोनेशन आणि बॉडी डोनेशन या दोन्ही लघुपटांनी ऑस्कर मान्यता प्राप्त करून आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक विक्रम नोंदवला आहे. तालुका पातळीवर मेडिकल कॉलेजमधून आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालेला हा पहिलाच लघुपट ठरला आहे.