कऱ्हाड : मोकाट कुत्र्यांची कऱ्हाडला दहशत

दहा वर्षांत दोघांचा बळी; उपाययोजना थंडावल्या, पालिकेचे उपाययोजनांकडे दुर्लक्ष
dogs
dogssakal

कऱ्हाड : शहरासह लगतच्या हद्दवाढ भागातील विविध कॉलन्यांसह शेतशिवारात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढत आहे. नुकताच घराबाहेर खेळणाऱ्या चिमकुल्याने हल्ल्यात जीव गमावला. वाखाण भागात १० वर्षांतील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे या भागातील लोकांचा जीव टांगणीला लागला आहे. दिवसाढवळ्याही मोकाट कुत्री बिनदिक्कतपणे हल्ला करत असल्याने रात्री, पहाटेच्या वेळेस मोकाट कुत्र्यांची दहशत कहर करणारीच आहे.

असे असताना पालिका कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या जवळपास चार हजारांपर्यंत आहे. पालिकेची निर्बिजीकरण मोहीम बंद असल्याने मोकाट कुत्र्यांची दहशत व संख्याही वाढली आहे. सर्व्हे होऊनही पालिकेकडून उपाययोजना होत नसल्याने मोकाट कुत्र्यांची डोकेदुखी वाढली आहे.

  • कुत्र्यांच्या वावराची ठिकाणे...

  • शहरालगतची शेतशिवारे

  • वाखाण भागातील वस्त्या

  • मटण शॉप, कचरा डेपो, चायनीज हातगाडे

  • खाद्यपदार्थांचे दुकानांबाहेर

  • हॉटल, खानावळींसह हातगाड्यांच्‍या भोवताली

  • नागरी वस्तीत घराबाहेरील खरखाटे खाण्यास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com