दुर्मिळ खजिना जपणारे किरण गावंड

किरण गावंड म्हणजे मोठे लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व. लष्करात कार्यरत असताना त्यांनी कसलेही वेतन न घेता देशसेवा बजावली. पर्यटनाच्या छंदातून जगातील कैक देशांची मुसाफिरी केली.
Kiran Gawand
Kiran GawandSakal
Summary

किरण गावंड म्हणजे मोठे लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व. लष्करात कार्यरत असताना त्यांनी कसलेही वेतन न घेता देशसेवा बजावली. पर्यटनाच्या छंदातून जगातील कैक देशांची मुसाफिरी केली.

किरण गावंड (Kiran Gawand) म्हणजे मोठे लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व. लष्करात कार्यरत असताना त्यांनी कसलेही वेतन न घेता देशसेवा बजावली. पर्यटनाच्या (Tourism) छंदातून जगातील कैक देशांची मुसाफिरी केली. त्यातून कित्येक दुर्मिळ वस्तू (Rare Items) जमविल्या. त्यांच्या पूर्वजांचा खजिनाही त्यांनी प्राणपणाने जपला. त्यातून ठोसेघरनजीकच्या बोरणे (ता. सातारा) इथे अनोखे संग्रहालय आकारास आले आहे.

सातारा तालुक्यातील बोरणे येथील श्रीमती काशिबाई माधवराव गावंड संग्रहालय म्हणजे संस्कृतीचा अमूल्य ठेवा. किरण गावंड यांच्या आगळ्या संकल्पनेतून, वेगळ्या दृष्टीतून तो साकारला आहे. अत्यंत समृद्ध अन् संपन्न वारसा त्यांच्या कुटुंबाला लाभला. त्यांच्या आजी काशिबाई गावंड म्हणजे अत्यंत कर्तबगार स्त्री. सुमारे १०० वर्षांपूर्वी त्यांनी भारतभ्रमण केले. त्यातून कित्येक दुर्मिळ वस्तू त्यांच्या संग्रही जमा झाल्या. हाच वारसा किरण गावंड यांनी समर्थपणे जपला. तो संग्रहालयाच्या रूपाने अबाधित राखला. आज या संग्रहालयात अंदाजे दोन लाख नाणी आहेत. त्यात सोने, तांबे, पितळ, शिसे, जस्त, पंचधातूची नाण्यांचा समावेश आहे. अगदी दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीच्या नाण्यांपासून शिवकालातील नाण्यांचा त्यात समावेश आहे. जगातील ६० देशांतील नोटाही इथे संग्रहित आहेत. भांडी विभागात देशभरातील वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण भांडी इथे दिसतात. अगदी तीनशे वर्षांपूर्वीची भांडी, त्यावर हाताने केलेले नक्षीकाम पाहून आपण अचंबित होतो. कॅमेरा दालनात १०० हून अधिक कॅमेरे दिसतात. उल्लेखनीय म्हणजे १९५० मधील मूव्ही कॅमेरा अन् प्रोजेक्टरही इथे आहे.

श्री. गावंड यांनी ऑस्ट्रेलिया, कॅनडा यासह कैक देशात भटकंती केली. हिमालयात ते कित्येकदा गेले. तिथून आणलेले गारगोटी (क्रिस्टल), रत्नांचे मूळ दगड, फाॅसिल्स इथे दिसतात. अंदमान, मालदिव आदी ठिकाणांहून आणलेले मोत्यांचे शंख- शिंपलेही भरपूर आहेत. शस्त्र विभागात तीनशे ते पाचशे वर्षांपूर्वीच्या ढाली, कट्यारी, कुऱ्हाडी, खंजिरी, भाले, बंदुका, पिस्तुले, जिरेटोप, तोफा, तोफगोळे आहेत. या वाटचालीत पत्नी सुजाता, कन्या कल्याणी नाईक, केतकी राय, तसेच कुटुंबाचे सहकार्य लाभत असल्याचे श्री. गावंड सांगतात.

ठेवा जोपासण्याची गरज

आपल्या पूर्वजांनी जतन केलेल्या जुन्या वस्तू म्हणजे अमूल्य ठेवा. तो आपण जपायला हवा. परदेशात खास करून युरोपीय देशांत कुटुंबातील पिढीजात वस्तू आत्मीयतेने जतन करण्याची परंपरा आहे. त्या दृष्टीने प्रत्येकाने नव्या पिढीवर याविषयीचे संस्कार करणे अगत्याचे असल्याचे श्री. गावंड या निमित्ताने नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com