

Rare Green Pigeon Spotted in Kirkasal; Villagers Celebrate Biodiversity Success
Sakal
-फिरोज तांबोळी
गोंदवले : वन्यजीव संवर्धनासाठी अग्रेसर असलेल्या आदर्शगाव किरकसालच्या शिवारात दुर्मिळ असणाऱ्या राज्यपक्षी हरियालचे दर्शन झाले आहे. अभ्यासकांनी या पक्ष्याची चित्रफीत बनवली असून, आणखी एका दुर्मिळ पक्ष्याची नोंद झाल्याने किरकसालकरांना जैवविविधतेच्या कामामध्ये मोठे यश मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे. यापूर्वी राज्य फुलपाखरू ब्लू मॉरमॉनचे दर्शन झाले होते.