
कऱ्हाड : सत्ताधारी पक्षाकडून आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला यश आले नाही. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी त्या कायद्यातील त्रुटी मान्य केल्या आहेत, तरीही केंद्राने लागू केलेल्या कायद्याबाबत शेतकऱ्यांत भ्रम पसरवला जात आहे. त्या भ्रमाचा भोपळा फोडण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कायदे समजून सांगून 26 जानेवारीला प्रजासत्ताकदिनी राजपथावर ट्रॅक्टर नेऊन संसदेला घेराव घालण्याच्या जनजागृतीसाठी पोलखोल यात्रा सुरू केल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा
केंद्र सरकारने केलेल्या कायद्यासंदर्भात आयोजित पोलखोल यात्रा साेमवारी येथे आली. तत्पूर्वी त्यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लक्ष्मण वंगे, महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकर दरेकर, महासंघाचे उपाध्यक्ष अरुण कान्हेरे, नितीन थोरात, बळिराजा शेतकरी संघनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, उत्तम खबाले, केशव बोडके, प्रकाश पाटील, अविनाश फुके, दीपक पाटील, पोपट जाधव, सागर कांबळे, संदीप साळुंखे आदी उपस्थित होते.
सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार महिलेच्या अंगलट; न्यायालयाने शिकवली अद्दल!
श्री. गिड्डे म्हणाले, ""राज्यातील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी बदाम- पिस्ता खाणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन असे हिनवले आहे. शेतकरीच बदाम- पिस्ता पिकवतात. त्यामुळे त्यांचा तो खाण्याचा अधिकाराच आहे.'' श्री. वंगे म्हणाले, ""कृषी कायद्यामुळे हा देश आपण नवीन ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात देणार आहोत. 70 शेतकऱ्यांचे बलिदान होऊनही सरकारकडून शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नाही, ही शोकांतिका आहे. देशात उद्योगपतींनी सुचवायचे आणि केंद्राने कायदे करायची, अशी स्थिती आहे. कायद्यामुळे शेतकऱ्यांबरोबर ग्राहकही भरडले जाणार आहेत.''
चंद्रकांत पाटलांना थेट आव्हान
मुठभर शेतकऱ्यांसाठी कायदे रद्द करता येत नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधान केले. त्यांनी दिल्लीच्या सीमेवर येऊन शेतकरी मूठभर आहेत, की किती हे पाहावे, असे जाहीर आव्हान संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे यांनी पाटील यांना उद्योगपतींसाठी केलेले कायदे रद्द करा, अशी मागणी केली.
शिवेंद्रसिंहराजेंसह समर्थकांना न्यायालयात मिळाला दिलासा
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.