Sakal Impact : मलकापूरला नो पार्किंग झोनचे फलक

पालिकेच्या बांधकाम विभागाकडून कार्यवाही; नागरिकांतून समाधान
No parking board Malkapur satara Kolhapur Naka to Koyna colony
No parking board Malkapur satara Kolhapur Naka to Koyna colonysakal

मलकापूर : कोल्हापूर नाका ते कोयना वसाहत प्रवेशद्वारापर्यंत नो पार्किंग झोन वाहतूक पोलिसांनी केला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, असे वृत्त दैनिक ‘सकाळ’ने आज प्रसिद्ध केल्यानंतर पालिकेच्या बांधकाम विभागाने तातडीने कोल्हापूर नाका ते कोयना वसाहत या सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूला नो पार्किंग झोनचे फलक लावले आहेत. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

कोल्हापूर नाका ते कोयना वसाहत प्रवेशद्वार या परिसरातील उपमार्गावर नेहमीच गाड्यांची रेलचेल असते. अनेक छोटे- मोठे वाहनधारक या ठिकाणी दिवसभर गाड्या बिनधास्तपणे लावत असतात. बेशिस्त पार्किंगमुळे येथील ढेबेवाडी फाटा ते मलकापूर फाटा परिसरात स्टॉल्स, वाहनांची गर्दी व बेशिस्त पार्किंगमुळे सतत वाहतूक कोंडी होत आहे. ढेबेवाडी फाटा मुख्य रस्ता, कोल्हापूर नाका, कृष्णा रुग्णालय परिसर, मलकापूर फाटा, दोन्ही उपमार्ग व कऱ्हाड- ढेबेवाडी रस्ता या ठिकाणी अस्ताव्यस्त पार्किंगमुळे अनेक वेळा वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली असते. ढेबेवाडी फाटा ते मलकापूर फाटा परिसरात दोन्ही बाजूला उपमार्गालगतच पार्किंग करत असल्याने लोकांना त्यातूनच मार्ग काढत जावे लागत असल्यामुळे छोटे- मोठे अपघात होऊन किरकोळ वादाचे प्रसंग वारंवार उद्‍भवत आहेत. यावर पर्याय म्हणून पोलिस वाहतूक विभागाने या व्यावसायिकांना नोटिसा देऊन नो पार्किंग झोन केला आहे.

सुरुवातीच्या दोन दिवसांत पोलिसांनी अंमलबजावणीसाठी सुरुवात केली. मात्र, ही अंमलबजावणी दोन दिवस केल्याने पुन्हा जैसे थे परिस्थिती याठिकाणी निर्माण झाली होती. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध केल्यानंतर आज नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने तातडीने कोल्हापूर नाका ते कोयना वसाहत प्रवेशद्वार, तसेच पूर्व बाजूस गंधर्व हॉटेल ते पंकज हॉटेलपर्यंत ३५ फलक लावले आहेत. एकूण ४० फलक लावण्यात येणार असून, उर्वरित फलक लावण्याचे काम सुरू होते. आयडीबीआय बँकेच्या सौजन्याने हे फलक लावण्यात आले असल्याची माहिती नगर अभियंता शशिकांत पवार यांनी दिली. मार्गावर ती तातडीने फलक लावल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com