आमच्या नादाला लागलात, तर तुमचा करेक्ट कार्यक्रम करु; शिवसेना आमदाराचा राष्ट्रवादीला थेट इशारा

'रामराजेंना भाजपमध्ये घेण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल.'
Koregaon Assembly Shiv sena rebel MLA Mahesh Shinde
Koregaon Assembly Shiv sena rebel MLA Mahesh Shindeesakal
Summary

'रामराजेंना भाजपमध्ये घेण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल.'

सातारा : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारांनी बंडखोरी केली. ही बंडखोरी शिवसेनेतील (Shiv Sena) आत्तापर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी ठरलीय. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत मिळून राज्यात सत्ता स्थापन केली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनल्यावर त्यांना शिवसेनेचे नगरसेवक, नेते, पदाधिकारी, खासदार यांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होताच कोरेगाव विधानसभेचे (Koregaon Assembly) बंडखोर आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी राष्ट्रवादीला (NCP) थेट इशारा दिलाय. आम्ही छोटासा चिमटा काढला, तर आख्खं राज्य बदलून टाकलं. तेव्हा आमच्या नादाला लागलात तर तुमचा करेक्ट कार्यक्रम करण्यात येईल. आमच्या सोबत मुख्यमंत्री शिंदे पण आहेत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण आहेत, असा इशारा शिंदेंनी दिलाय. साताऱ्यातील जुन्या एमआयडीसी इथं एका कार्यक्रमात आमदार शिंदे बोलत होते.

Koregaon Assembly Shiv sena rebel MLA Mahesh Shinde
BJP : महाराष्ट्रानंतर 'या' राज्यात लवकरच सत्तांतर; भाजपचे 16 आमदार फुटणार?

कोरेगाव शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यासाठी रेल्वे स्टेशन इथं फिल्टरेशन प्लांट उभारण्यात आला असून याचं लोकार्पण कोरेगाव तालुक्याचे आमदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याद्वारे कोरेगाव शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी देण्यात येणार असल्यानं आरोग्याचा प्रश्न मिटणार असल्याचं शिंदे यांनी या प्रसंगी सांगितलं. मंत्री होण्याची प्रत्येकाला इच्छा आहे. मला आमचे नेते एकनाथ शिंदे हे माझ्या अंगामधील गुणांना वाव देऊन मला मंत्रिमंडळात निश्चित संधी देतील, असं सांगत मंत्री पदाची इच्छा शिंदेंनी बोलून दाखवलीय.

Koregaon Assembly Shiv sena rebel MLA Mahesh Shinde
छत्रपतींच्या बाबतीतही विश्वासघातकाचं राजकारण, पाठीत खंजिर खुपसणाऱ्यांना जनता माफ करणार नाही : राऊत

शिंदे पुढं म्हणाले, रामराजेंना भाजपमध्ये घेण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल, मी छोटा आमदार आहे. खळ उठळ आहे, वस्ती उठवायला वेळ लागणार नाही. काही ठराविक जणांना पक्षात घेणार असल्याचं सांगत शिवसेनेचे 80 टक्के जिल्हा प्रमुख हे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहेत. राष्ट्रवादीला विचारधारा काय आहे? यांचं उचल त्यांचं उचल. कारखाना, सूतगिरणी खाऊन भ्रष्टाचार करणं असलं राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा विसर हा राष्ट्रवादीच्या नेत्यांना पडला आहे. त्यामुळं त्यांना आता पक्ष टिकवणं अवघड झालंय, म्हणूनच रोहित पवार निवडणुका लागतील विधान करत आहेत, असं सांगत शिंदेंनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली.

Koregaon Assembly Shiv sena rebel MLA Mahesh Shinde
..तर भाजप-टीएमसी खासदारांना मी फोन करु शकणार नाही; असं का म्हणाल्या मार्गारेट अल्वा?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com