

Two Held in ₹1.25 Crore Real Estate Fraud Case in Koregaon
sakal
कोरेगाव: कवठेमहांकाळ (जि. सांगली) येथील जमीन खरेदीप्रकरणी बावधन (पुणे) येथील राजेश महादेव शेकटकर आणि सातारा (सदरबझार) येथील गोपाल सुकुमारन वेलियाविटील या दोघांनी येथील एका रिअल इस्टेट डेव्हलपरची संगनमताने एक कोटी ३१ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा येथील पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. कोरेगाव पोलिसांनी संशयितांना अटक करून न्यायालयात उभे केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.