कोरेगाव : वाठारला मिळणार शेतमालावर कर्ज

बाजार समितीत ठेवावे लागणार तारण; सहा टक्के व्याजदर
Crop Loan News
Crop Loan NewsSakal

कोरेगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीने उपबाजार आवार वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथे यावर्षी शेतमाल तारण कर्ज योजना राबवण्याचे ठरवले असून, शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. कोरेगाव बाजार समितीने उपबाजार आवार वाठार स्टेशन येथे १००० मेट्रिक टन शेतमाल साठवण क्षमतेचे गोदाम बांधले असून, त्याचे उद्‍घाटन गत एप्रिल २०२२ मध्ये झालेले आहे. या गोदामांचा वापर हा प्रामुख्याने ‘शेतमाल तारण कर्ज’ योजनेसाठी करावयाचा मानस बाजार समितीने केलेला आहे. तेव्हा कोरेगाव तालुक्यात आणि परिसरामध्ये उत्पादित होणारा सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, मालाच्या किमतीच्या ७० टक्के कर्ज

गोदामामध्ये जेवढा शेतमाल तारण ठेवण्यात आलेला असेल, त्या शेतीमालाच्या एकूण किमतीच्या ७५ टक्केपर्यंतचे कर्ज वार्षिक सहा टक्के व्याजदराने शेतकऱ्याला दिले जाईल. या कर्जाची मुदत ही सहा महिने म्हणजे १८० दिवस असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com