esakal | कोविड सेंटरमधील हस्तक्षेप थांबवा; राजाभाऊ जगदाळे आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

covid center

कोविड सेंटरमधील हस्तक्षेप थांबवा; राजाभाऊ जगदाळे आक्रमक

sakal_logo
By
राजेंद्र वाघ

कोरेगाव (जि. सातारा) : येथील उपजिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर खासगी सहभागातून कार्यान्वित केलेल्या कोविड सेंटरमध्ये राजकीयदृष्ट्या प्रेरित असलेल्या खासगी व्यक्तींचा हस्तक्षेप होत आहे. कुमठे येथील स्वातंत्र्यसैनिकाच्या वारस असलेल्या महिला रुग्णालाही या ठिकाणच्या खासगी कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करून घेतले नसल्याचा आरोप सभापती राजाभाऊ जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या सेंटरमधील राजकीय हस्तक्षेप थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर खासगी सहभागातून कार्यान्वित केलेल्या कोविड सेंटरमध्ये राजकीयदृष्ट्या प्रेरित असलेल्या खासगी व्यक्तींचा हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली या कोविड सेंटरचे कामकाज चालवले जावे, या ठिकाणच्या लसीकरण केंद्रामध्ये होत असलेला खासगी व्यक्तींचा हस्तक्षेप थांबवावा. येथील ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरचा ताबा व जबाबदारी शासननियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांकडेच ठेवावी, अशी मागणी सभापती जगदाळे यांनी केली आहे. कुमठेतील मुलगी आईला घेऊन ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये गेली होती. तेथे ऑक्‍सिजनयुक्त बेड्‌स नसल्याने त्यांना पहिला मजल्यावरील कोविड सेंटरमध्ये जाण्यास सांगण्यात आले. तेथे गेल्यावर संबंधितांनी राजकीय प्रश्‍न उपस्थित केले, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा: आता कसं हाेणार? अनिल अंबानींपुढे निर्माण झालाय पेच

सद्य:स्थितीत सर्वांच्याच सहकार्याची अपेक्षा : पाटील

यासंदर्भात सभापती जगदाळे, उपसभापती संजय साळुंखे, जितेंद्र जगदाळे यांनी प्रांताधिकारी ज्योती पाटील यांचीही भेट घेतली. त्यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्थापनाचे सर्व अधिकार वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज करपे यांनाच असल्याचे नमूद करून त्या म्हणाल्या, ""कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याने सद्य:स्थितीत सर्वांच्याच सहकार्याची आवश्‍यकता आहे. कुमठ्यातील महिला रुग्णाला कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करून घेतले नसल्याच्या विषयासंदर्भात मला काही समजलेले नाही. याविषयी माहिती घेतली जाईल आणि तसे काही घडले असल्यास प्रशासन म्हणून मी स्वतः संबंधित कुटुंबास भेटून दिलगिरी व्यक्त करेन.''

हेही वाचा: चिमणगावात सरकारमान्य रेशन दुकानात दारूविक्री; सात लाखाचा मुद्देमाल जप्त

loading image