काेयना धरणाचे आज दुपारी दरवाजे उघडणार

विजय लाड
Friday, 14 August 2020

कोयना धरणाची सध्याची पाणी पातळी 2144. 03 अशी आहे. धरणात सध्याचा पाणीसाठा 82.75 टीएमसी इतका आहे. धरणात येणाऱ्या सध्याची पाण्याची आवक 41389 क्युसेक आहे.

काेयनानगर (जि.सातारा) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक यामुळे वाढली असून यामुळे धरणाच्या पाणीसाठय़ात चोवीस तासात दाेन टीएमसीने वाढ झाली आहे. धरण परीचलन सूची पेक्षा जादा पाणीसाठा धरणात झाला आहे.

धरणात सध्या 82.75 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरुच असल्याने धरणाची जलपातळी वाढत असून ती पायथा वीज गृह कार्यान्वित करून सुध्दा नियंत्रित होणार नसल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे आज (शुक्रवार) दुपारी दाेन वाजता नऊ इंचाने उघडून पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याचा निर्णय कोयना धरण व्यवस्थापनाने घेतला असल्याची माहिती कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.

'याच' वेळी साेडा काेयना धरणातील पाणी : गृहराज्यमंत्र्यांची सूचना

अकरावी प्रवेश प्रक्रिया रद्द... जाणून घ्या नवे वेळापत्रक

कोयना धरणाची सध्याची पाणी पातळी 2144. 03 अशी आहे. धरणात सध्याचा पाणीसाठा 82.75 टीएमसी इतका आहे. धरणात येणाऱ्या सध्याची पाण्याची आवक 41389 क्युसेक आहे. आज सकाळी 11 वाजता धरण पायथा विजगृहातून 2100 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. पायथा सुरु करून सुध्दा धरणाची जल पातळी नियंत्रित होणार नसल्याने आज (शुक्रवार) दुपारी दाेन वाजता रेडियल नऊ  इंच उचलण्यात येणार आहेत. त्यावेळी एकूण विसर्ग 2100 क्युसेक वरून 5800 क्युसेक असेल.

सांगली, कऱ्हाडकरांनो सावधान! पावसाचा जोर वाढतोय.... कोयना धरण विभागाचे हे आवाहन

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Koyna Dam Administration Will Release Water From Dam Today In Afternoon