
सातारा : यंदा जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातच जिल्ह्यातील कोयना, धोम, कण्हेर आदी प्रमुख धरणांत ७० टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात तिप्पट पाणीसाठा झाला आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सध्या चार धरणांतून ११ हजार ४५१ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३०३ मिलिमीटर पाऊस झाला असून, सरासरीच्या ११५ टक्के आहे.