'कृष्णा'च्या तीन कर्मचाऱ्यांकडून प्लाझ्मा दान; इतरांनी पुढे येण्याचे आवाहन

'कृष्णा'च्या तीन कर्मचाऱ्यांकडून प्लाझ्मा दान; इतरांनी पुढे येण्याचे आवाहन

कऱ्हाड : येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा संकलन केंद्रास प्रारंभ करण्यात आला आहे. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते केंद्राचे नुकतेच उद्‌घाटन झाले. यावेळी हॉस्पिटलच्या तीन कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दान केला. इतरांनीही त्यासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अद्यापपर्यंत प्रभावी औषध निर्माण झालेले नाही. तसेच त्याच्या प्रतिबंधाची लसही अजून संशोधनाच्या प्रतीक्षेत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना नियंत्रणासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यापैकी प्लाझ्मा थेरपी हा एक आशेचा किरण म्हणून पुढे येत आहे.

आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत जाहिर केलेल्या मदतीमुळे अर्थव्यवस्थेला बळ 

पश्‍चिम महाराष्ट्रात कोरोनामुक्तीच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलला प्लाझ्मा थेरपीस मान्यता मिळाली आहे. अशी मान्यता लाभलेले कृष्णा हॉस्पिटल हे जिल्ह्यातील एकमेव रुग्णालय असून, या थेरपीचा लाभ कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी अधिक लाभदायी ठरणार आहे.

"कृष्णा'मध्ये प्लाझ्मा संकलनासाठी स्वतंत्र प्लाझ्मा फेरेसिस युनिट साकारण्यात आले असून, रक्तातून प्लाझ्मा घटकांचे विलगीकरण करणाऱ्या अद्ययावत यंत्रसामग्रीचीही उभारणी करण्यात आली आहे. कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. विश्वास पाटील, राजेंद्र संदे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

कमालच आहे, फुलपाखरे मिमिक्री करतात ! सोलापूरच्या अभ्यासकांनी लावला शोध

Edited By : Siddharth Latkar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com