Satara : कऱ्हाडमध्ये मगरीच्या हल्ल्यात एकजण जखमी

येथील कृष्णा कोयना नदीच्या प्रिती संगमात पोहरणाऱ्या एकावर व्यक्तीवर आज सकाळी सहाच्या सुमारास मगरीने हल्ला केला
Crocodile attack
Crocodile attacksakal

कऱ्हाड : येथील कृष्णा कोयना नदीच्या प्रिती संगमात पोहरणाऱ्या एकावर व्यक्तीवर आज सकाळी सहाच्या सुमारास मगरीने हल्ला केला. त्यात ते जखमी झाले आहेत. मधुकर लक्ष्मण थोरात असे त्यांचे नाव आहे. यांच्यावर मगरीने हल्ला केला. यामध्ये थोरात हे जखमी झाले आहेत. त्‍यांच्या पायाला जखम झाली आहे. द या घटनेने मुळे खळबळ उडाली आह्ये.

येथील कृष्णा नदीत रोज सकाळी नागरिक पोहायला जाताक. त्याप्रामाणे आज सकाळी सहाच्या सुमारास सुमारे तीस जण पोहत होते. पोहणारे तीन-चार लोक नदीत मध्यभागी गेले असता, त्यावेळी मधुकर थोरात यांच्या पायाला कोणीतरी ओढत असल्याची त्‍यांना जाणीव झाली. त्यांनी पाहिले असता मगरीने त्यांच्या पायाला तोंडात पकडले असल्‍याचे त्‍यांना दिसले. त्यामुळे ते घाबरले. त्‍यांनी आरडाओरडा करायला सुरूवात केली.

त्‍यांचे अन्य मित्र जवळ आले. त्यांनी थोरात यांना नदीतून बाहेर काढले. मगरीच्या हल्ल्यात त्यांच्या पायाला जखम झावी आहे. थोराच यांना सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. घटनेनंतर कृष्णा नदीत पोहायला येणाऱ्यात घबराट होतीशहरातही खळबळ उडाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com