
अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली कृष्णा कारखान्याकडून जीएसटी कराचा नियमित भरणा केला जातो.
'कृष्णा'च्या शिरपेचात मानाचा तुरा
रेठरे बुद्रुक (सातारा) : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने (Yashwantrao Mohite Krishna Cooperative Sugar Factory) सन 2020-21 या आर्थिक वर्षात 31 मार्च अखेर जीएसटी कर प्रणाली (GST tax system) नियमित भरणा करून तत्पर कार्यवाही केल्याबद्दल भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे (Ministry of Finance) केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने कारखान्याला 'सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन प्रमाणपत्र' (Certificate of Appreciation Certificate) प्रदान करून सन्मान केला आहे. (Krishna Sugar Factory Honored By Union Finance Ministry Satara Marathi News)
अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले (President Dr. Suresh Bhosale) यांच्या कुशल नेतृत्वाखाली कृष्णा कारखान्याकडून जीएसटी कराचा नियमित भरणा केला जातो. केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाचे अध्यक्ष एम अजितकुमार यांनी हे प्रमाणपत्र प्रदान केल्याची माहिती कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी दिली. केंद्र शासनाने जुलै 2017 मध्ये जीएसटी कर प्रणाली लागू केली. तेव्हापासून 31 मार्च 2021 पर्यंत यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने अत्यंत तत्परतेने व नियमितपणे जीएसटी रक्कम तसेच विवरण पत्रके वेळेत भरणा करून केंद्र शासनास सहकार्य केले आहे. त्याबद्दल भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने कारखान्याला 'सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन प्रमाणपत्र' प्रदान करून सन्मान केला आहे. नियमितपणे जीएसटी भरणा करण्याकामी जीएसटी सल्लागार जी. एस. थोरात, ॲड. व्ही. बी. गायकवाड, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, फायनान्स मॅनेजर सी. एन. मिसाळ व कारखान्याच्या जीएसटी विभागाने विशेष परिश्रम घेतले.
वस्तु व सेवाकर विभागाकडूनही अभिनंदन
कृष्णा कारखान्याने राज्य शासनाकडे सन 2019-20 या आर्थिक वर्षात व्हॅट करापोटी 77 कोटी 16 लाख रूपये आणि जीएसटी पोटी 9 कोटी 5 लाख असा एकूण 86 कोटी 21 लाख रूपयांचा भरणा केला आहे. सातारा जिल्ह्यात इतक्या मोठ्या रक्कमेचा महसूल कर कृष्णा कारखान्याने शासनाकडे भरल्याबद्दल वस्तू व सेवाकर विभागाने कृष्णा कारखान्याचे विशेष अभिनंदन केले होते.
Krishna Sugar Factory Honored By Union Finance Ministry Satara Marathi News