
रेठरे बुद्रुक : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला उच्च तांत्रिक कार्यक्षमतेसाठी प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने नवी दिल्लीत गौरविण्यात आले. देशातील साखर क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.