

Kumar Shinde Slams Administration for Poll Delay; Mahabaleshwar Case Heading to Court
Sakal
महाबळेश्वर: येथील पालिकेच्या निवडणुकीसंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. तरीही आपण उमेदवारांना चिन्ह वाटप करून बेकायदेशीर काम करत आहात, असे लेखी पत्र देऊन देखील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी राजकीय दबावापोटी ही प्रक्रिया पार पाडली. राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास ही चुकीची बाब आम्ही आणून दिल्यानंतर त्यांनी नव्याने निवडणूक प्रक्रिया घेण्याचे आदेश दिले. ज्या अधिकाऱ्यांमुळे उमेदवारांचे आर्थिक नुकसान झाले, त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कोल्हापूर उच्च न्यायालयात आम्ही याचिका दाखल करणार आहे, तसेच जिल्हा न्यायालयाने उमेदवारांविरोधातील जी याचिका फेटाळली आहे, त्यावरही उच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याची माहिती गिरिस्थान नगर विकास आघाडीचे (नियोजित) नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.