
खंडाळा : कुसगाव (ता. वाई) येथील दगड खाण व स्टोन क्रेशरला बेकायदा परवानगी दिल्याचा निषेधार्थ वाईहून मुंबईतील मंत्रालयाच्या दिशेने लाँग मार्च निघाला आहे. यामध्ये आज जिल्ह्याच्या सीमेवर नीरा नदीच्या पुलावर दंडवत आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.