
सातारा : गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली गुंठे क्षेत्राची खरेदी विक्रीचे व्यवहार आता पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार एक, दोन, तीन किंवा चार ते पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. यासाठी पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या रेडीरेकनरच्या पाच टक्के रक्कम शुल्क म्हणून शासनाला भरावी लागणार आहे; पण केवळ विहीर, घरकुल बांधकाम व रस्त्यासाठी गुंठ्याच्या खरेदी-विक्रीस परवानगी मिळणार आहे. सध्या केवळ शहरी भागासाठी अट शिथिल झाल्यामुळे शहरात गुंठ्यांचे व्यवहार कायदेशीरपणे होण्यास मदत मिळणार आहे.