वाईत देरुखकरवाडी वस्तीवर कोसळली दरड; पंधरा जण सुखरुप, पाच अडकले

वाईत देरुखकरवाडी वस्तीवर कोसळली दरड.
वाईत देरुखकरवाडी वस्तीवर कोसळली दरड.सकाळ

वाई (जि.सातारा) : साताऱ्यात (Satara) व महाबळेश्वर (Mahabaleshwar) भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू असून वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील देवरुखवाडी या वस्तीवर पाच ते सहा घरांवर गुरुवारी (ता.२२) रात्री आठ साडेआठच्या सुमाराला दरड कोसळून (Land Slide) वीस रहिवासी अडकले. या परिसरात वीस घरे असून त्यातील पाच ते सहा घरे त्यातील कुटूंबियांसह दरडी खाली अडकली आहेत. यामध्ये वीस लोक अडकले आहेत. त्यातील पंधरा लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. प्रशासन व आरोग्य व्यवस्था घटनास्थळी पोहोचली आहे. जेसीपीच्या मदतीने दरड हटविण्याचे काम सुरू आहे. या घरातून बाहेर काढलेल्या तीन-तीन लोक अत्यवस्थ असून त्यांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. वाई (Wai) तालुक्याच्या पश्चिम भागात धोम धरणाच्या (Dhom Dam) लगत देवरुखकरवाडी या वस्तीवर रात्री आठ साडेआठच्या सुमाराला दरड कोसळली या वस्तीवर वीस घरे आहेत. पाच ते सहा घरांवर दरड कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली वीसहून अधिक लोक अडकले असण्याची शक्यता आहे. (land slide on residential area in wai tahsil of satara glp88)

वाईत देरुखकरवाडी वस्तीवर कोसळली दरड.
मरणार असलो तरी तुम्ही चांगले जगा! मित्रांना पाठवला शेवटचा निरोप

त्यातील पंधरा लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. मदत कार्यासाठी प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहे. या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक या परिसरातील वीज खांब पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे मदत कार्यात अडचण येत आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच आमदार मकरंद पाटील, तहसीलदार रणजीत भोसले, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे सर्व प्रशासन आरोग्य व्यवस्था रुग्णवाहिका या ठिकाणी पोहोचले आहेत. चार जेसीबीच्या माध्यमातून युद्धपातळीवर दरड बाजूला हटविण्याचे काम सुरू आहे. दरडी खालून काढलेल्यातील तीन लोक अत्यवस्थ असून त्यांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. हा भाग दुर्गम असल्यामुळे आणि या मार्गावरील रस्ते व पूल मुसळधार पावसात वाहून गेल्यामुळे जागेवर पोहोचण्यात व मदत कार्यात अडचणी येत आहेत.

वाईत देरुखकरवाडी वस्तीवर कोसळली दरड.
लातुरात रिक्षावर झाड कोसळले अन् रिक्षाचालकाचा मृत्यू

दुचाकी गेली वाहून, काही जण जखमी

मुसळधार पावसामुळे दिवशी घाटातल्या मरळी दिवशी दरम्यान मातीच्या ढिगाऱ्यासह प्रवास करणाऱ्यासह दुचाकी वाहून गेल्याची घटना घडली. यात दोन गंभीर जखमी झाले आहेत. जखमीला उपचारासाठी कराडला पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी प्रांताधिकारी पाटण यानी भेट देवुन माहिती घेतली असुन उद्या सकाळी त्या दुचाकीसोबत वाहून गेलेल्याचा तपास घेतला जाणार असलची माहिती प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी दिली. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली महिती, अशी कि आज दिवसभर पाटण तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्ठी झाल्यामुळे पाटणसह ढेबेवाडी, कोयना, चाफळ तारळे परिसरातील ओढेनाले दुथढी भरुन वाहत आहेत. परिसरात संपूर्ण रहदारीखाली असणारे पुल पुराच्या पाण्यात गेले असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.दरम्यान पाटण काळोली येथील दोघे जण ढेबेवाडीला जात असताना मंद्रुळ कोळे पुलावर पाणी असल्याने परत काळोलिला जात असताना दिवशी मरळीनजीक एका ओढ्याचे पाणी रसत्यावरुन जोराने वाहत होते. या पाण्याबरोबर मातीचा ढिगारा आणि एक झाड आल्यामुळे दुचाकीसह अज्ञात वाहून गेले असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान हे वाहून आलेले झाड काढण्यासाठी मरळी येथील शेलेश कदम व काळोली येथील दत्तात्रय सुतार गेले असता हे झाड काढत असताना तेही या अपघातात जखमी झाले. यापैकी शैलेश कदम यांना उपचारासाठी कराडला पाठवण्यत आले आहे, तर यातील एक जण दिवशी गावात सुखरुप आहे.

वाईत देरुखकरवाडी वस्तीवर कोसळली दरड.
साताऱ्यात आज-उद्या मुसळधार; हवामान विभागाकडून 'Red Alert' जारी

मी घटनास्थळी स्वतः भेटून माहिती घेतली असता या अपघातात अजून दोन ते तिन जण अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. अंधार आणि खोलदरी असल्याने त्याना रेसक्यु करण्यात अडचण येत आहे. अजूनही खोल दरीत असणाऱ्या दुचाकीसह चालक व अजून किती जण अडकलेत याची माहिती घेत आहोत. उद्या सकाळी हे रेसक्यु आॅपरेशन सुरू करणार आहोत.

- श्रीरंग तांबे, प्रांताधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com