Satara : महाबळेश्वर रोडवरील केळघर घाटात दरड कोसळली; रस्‍ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

landslide in khelghar ghat

महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.

Satara : महाबळेश्वर रोडवरील केळघर घाटात दरड कोसळली; रस्‍ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

सातारा : गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात (Mahabaleshwar Taluka) मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच आज सातारा-महाबळेश्वर घाट रस्त्यावर मोठी दरड कोसळून सातारा-महाबळेश्वर रस्ता (Satara-Mahabaleshwar Road) पूर्णतः वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

सातारा जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. परतीच्या पावसानं देखील धुमाकूळ घातला आहे. यातच जिल्ह्यात महाबळेश्वर-सातारा घाट रस्ता हा वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण असतानाच या घाटात केरघळ घाटात (Kerala Ghat) आज (शुक्रवार) सकाळी दरड कोसळून हा घाट रस्ता पूर्णतः वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्यामुळं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

हेही वाचा: Congress : उमेदवारी अर्जाचा आज शेवटचा दिवस; दिग्विजय सिंह यांच्यासह 'हे' 6 नेते रिंगणात!

अद्यापही बांधकाम विभागानं ही दरड हटवण्यास सुरुवात केली नसल्याची माहिती समोर आलीय. या घाटामध्ये सातत्यानं दरडी कोसळण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. पावसाळ्यात हा रस्ता किमान चार महिन्यात दहा ते बारा वेळा बंद होतो.

हेही वाचा: BJP : शरद पवारांच्या हस्तकाला पुन्हा अंडा सेल दाखवण्याची वेळ आलीय; भोसलेंचा भुजबळांवर प्रहार