Debris from the landslide blocks the Ambenali Ghat road, disrupting Mahabaleshwar–Poladpur traffic for several days.
Debris from the landslide blocks the Ambenali Ghat road, disrupting Mahabaleshwar–Poladpur traffic for several days.Sakal

पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! 'दरडीमुळे आंबेनळी घाट वाहतुकीसाठी बंद'; महाबळेश्वर- पोलादपूर मार्ग चार दिवस ठप्प राहणार

Landslide Shuts Down Ambenali Ghat : सुरूर ते पोलादपूर या दरम्यान हॅम योजनेतून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. वाईपासून महाबळेश्वरकडे, तर पोलादपूरपासून महाबळेश्वरकडे अशा प्रकारे दोन्ही बाजूने रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.
Published on

महाबळेश्वर : आंबेनळी घाटातील रस्ता रुंदीकरणाच्या कामातील ढिसाळ नियोजनामुळे घाटात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्या आहेत. या दरडी हटविण्याच्या कामासाठी आंबेनळी घाट वाहतुकीसाठी पुढील चार ते पाच दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, महाबळेश्वर- पोलादपूर दरम्यानची वाहतूक या कामामुळे ठप्प होणार आहे. त्यामुळे कोकणमार्गे महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होणार असून, पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com