
ढेबेवाडी : ढेबेवाडी- पाटण मार्गावरील दिवशी घाटात दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. आज पहाटे रस्त्यावर कोसळलेल्या दरडीमुळे मोठ्या वाहनांची ये- जा ठप्प झाल्याने तेथे अडकून पडलेल्या एसटीच्या चालक- वाहक व प्रवाशांनी रस्त्यावर उतरून दरडीचे कोसळलेले दगड, मुरूम बाजूला काढून बसचा मार्ग मोकळा केला. दिवशी घाटात दरडी कोसळून आतापर्यंत अनेकदा दुर्घटना घडल्या आहेत. दरडीच्या बाजूला संरक्षक जाळ्या बसवून वर्दळीचा घाटमार्ग सुरक्षित करण्याची मागणीही दुर्लक्षितच आहे.