लोणंद बाजारात शेतकरी, ग्राहकांची तुफान गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

लोणंद बाजारात शेतकरी, ग्राहकांची तुफान गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

लोणंद (जि. सातारा) : कोरोना संकटामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेला लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शेळ्या-मेंढ्यांचा आठवडे बाजार पुन्हा भरला. सहा महिने शेळ्या-मेंढ्यांची विक्री करता न आल्याने आणि दोन दिवसांवर दसऱ्याचा सण आल्याने शेळीमेंढी पालकांनी व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्याने आपल्या शेळ्या-मेंढ्या बाजारात विक्रीसाठी आणल्याने शेळ्या-मेंढ्यांची 7500 इतकी विक्रमी आवक झाली होती. त्यामुळे बाजार आवार शेतकरी, ग्राहक व वाहनांमुळे फुलून गेले होते. 

संसाराचा गाडा हाकताना हाती दोन पैसे यावेत, यासाठी दारातीत शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या, धान्य व भाजीपाला विकून त्यावर उदरनिर्वाह चालता ठेवव्याचा प्रयत्न शेतकरी वर्ग करताना दिसत आहेत. त्यामुळे आजच्या शेळी- मेंढी बाजारात, तसेच माळव्याच्या बाजारातही मोठी गर्दी झाली होती. मात्र, बाजारावर कोरोनाची छाया होती. कोरोना संपला नसल्याने प्रत्येक जण सोशल डिस्टन्सिंगचा अपवाद वगळता तोंडावर मास्कचा वापर करून, तसेच हातावर सॅनिटायझरचा वापर करून काळजी घेत वावरताना दिसत होते. त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने सर्व काही सुरू झाल्याचा प्रत्यय गुरुवारी लोणंदच्या आठवडे बाजारात आला.

शेळी-मेंढी बाजारात 7500 शेळ्या-मेंढ्यांची आवक झाली होती. त्यामध्ये 3500 नग शेळ्या, 2500 नग मेंढ्या व 500 नग बोकडांची आवक झाली होती. शेळी तीन हजार ते 20 हजार, मेंढी अडीच ते 18 हजार रुपये, तर बोकड 5 ते 35 हजार रुपयांपर्यंत प्रती नगाचे भाव निघाले होते, अशी माहिती लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विठ्ठल सपकाळ यांनी दिली. दरम्यान, बाजारात गुरुवारी झालेल्या लिलावा दरम्यान कांद्याचे भाव 5 हजार 500 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलला निघाले. दोन हजार पिशव्यांची आवक झाली होती. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com