काहीही करा; पण कुत्र्यांना आवरा, ढेबेवाडीत वर्दळीच्या रस्त्यांवरून फिरताहेत झुंडी

काहीही करा; पण कुत्र्यांना आवरा, ढेबेवाडीत वर्दळीच्या रस्त्यांवरून फिरताहेत झुंडी

ढेबेवाडी (जि. सातारा) : अगदी मेंढरांचे कळप निघाल्याप्रमाणेच मोकाट कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी वर्दळीच्या रस्त्यांसह शिवारातून धावत असल्याने "काहीही करा; पण कुत्री आवरा' असे म्हणायची वेळ ढेबेवाडीकरांवर आली आहे. अनेक वर्षांपासूनची ही समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चाललेली असतानाही त्यावर नेमका ईलाज शोधला जात नसल्याने व्यावसायिक, नागरिक व वाहनचालकातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

येथील बस स्थानक परिसर, बाजारतळ आणि प्रमुख रस्त्यांवर अनेक वर्षांपासून कुत्र्यांच्या झुंडीची दहशत कायम आहे. यातील अनेक कुत्री आक्रमक बनल्याने वाहनचालक, पादचारी, शालेय विद्यार्थी यांना जीव मुठीत धरूनच ये-जा करावी लागत आहे. मध्यवर्ती बाजारपेठ असल्याने ढेबेवाडीत नागरिकांची सतत वर्दळ असते. गर्दीच्या ठिकाणी कुत्र्यांच्या झुंडी झटापटी करतच वावरत असून, त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून येत असल्याने अनेकजण त्यांच्यापासून दूर राहण्याचाच प्रयत्न करताना दिसतात. अचानक कुत्री आडवी आल्याने आतापर्यंत अनेक दुचाकीस्वार अपघात होऊन जखमी झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. 

येथे अनेक ठिकाणी चिकन व मटण विक्रीची दुकाने आहेत. दिवसभर तेथे कुत्र्यांच्या झुंडी रेंगाळत असतात. चिकन, मटणाच्या टाकाऊ पदार्थांवर ताव मारताना त्यांच्यात भांडणे लागतात. आजूबाजूच्या गावातून येथे मोकाट कुत्री दाखल झाली असून, त्यात पाळीव कुत्रीही सहभागी झाल्याने कळपातील कुत्र्यांची संख्या वाढतच चालली आहे. शहरांमध्ये अशी समस्या निवारण्यासाठी मोकाट कुत्री पकडून त्यांचे निर्बीजीकरण केले जाते. मात्र, येथे अशी व्यवस्था नसल्याने कुत्र्यांच्या झुंडीचे करायचे तरी काय, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com