'हुतात्मा जवान सुजित किर्दत अमर रहे', चिंचणेरच्या सुपुत्रावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

'हुतात्मा जवान सुजित किर्दत अमर रहे', चिंचणेरच्या सुपुत्रावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Updated on: 

सातारा : सिक्कीम येथे लष्करी सेवेत कार्यरत असताना झालेल्या अपघातात चिंचणेर निंब (ता. सातारा) येथील जवान सुजित नवनाथ किर्दत हुतात्मा झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी चिंचणेर निंब येथे हजारोंच्या उपस्थितीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हुतात्मा सुजित यांच्या पार्थिवास मुलगा आर्यन याने मुखाग्नी दिला.
 
चिंचणेर निंब येथील सुजित हे लष्कराच्या इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. सध्या त्यांची नेमणूक सिक्कीम येथे होती. गस्तीदरम्यान झालेल्या अपघातात सुजित हे हुतात्मा झाले होते. याची माहिती समजताच चिंचणेर निंब पंचक्रोशीवर शोककळा पसरली. ग्रामस्थ हुतात्मा सुजित यांच्या पार्थिवाची आतुरतेने वाट पाहात होते. बुधवारी सकाळी त्यांचे पार्थिव घेऊन लष्करी वाहने चिंचणेर निंबकडे मार्गस्थ झाली. वाटेत ठिकठिकाणी नागरिकांनी हुतात्मा सुजित यांना अभिवादन केले. दुपारी त्यांचे पार्थिव चिंचणेर निंब येथील घरी नेण्यात आले. पार्थिव पाहून त्यांच्या कुटुंबीयांसह उपस्थितांना शोक अनावर झाला होता. वडील नवनाथ, पत्नी सुवर्णा, मुलगा आर्यन, मुलगी इच्छा, भाऊ अजित, तसेच नातेवाइकांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यांनतर ते अंत्यसंस्कार स्थळी नेण्यात आले. हुतात्मा सुजित यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या वेळी हजारो ग्रामस्थांची गर्दी झाली होती. गावागावांतील चौकाचौकांत त्यांना आदरांजली वाहणारे फलक लावण्यात आले होते, तसेच त्यांच्या पार्थिवावर फुलांची उधळण ग्रामस्थ करीत होते. अमर रहे अमर रहे सुजित किर्दत अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.

बेरोजगारीची चिंता विसरा, या 11 पैकी कोणतंही ज्ञान तुमच्याकडे असेल तर कंपन्या येतील तुमच्या मागे
 
अंत्यसंस्काराच्या ठिकाणी हुतात्मा सुजित यांना पोलिस, तसेच लष्करी जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. शासनाच्या वतीने आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, कोल्हापूर हेडक्वार्टर कमांडर स्टेशन कर्नल पराग गुप्ते, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांच्यासह लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी हुताम्या सुजित किर्दत यांना आदरांजली वाहिली. यानंतर शोकाकूल वातावरणात सुजित यांच्या पार्थिवास त्यांचा मुलगा आर्यन याने मुखाग्नी दिला.

कऱ्हाड व्हाया काश्मीर; जवान अजित पाटील, सुमनदेवीची प्यारवाली लव्ह स्टोरी 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara District Bank Election Scrutiny Sees Seven Objections Lawyers Argue Over Cooperative Law And Candidate Eligibility
Kisan Veer Sugar Factory Salary Crisis Workers Protest Over Unpaid Wages Anger Grows Against Makarand Patil And Nitin Patil
Pune Bengaluru Highway to Karad City
Satara News 17 Year Old Girl Dies In Family Dispute Over Mobile Phone And Television Father Loses His Temper
Marathi News Esakal
www.esakal.com