युवकांचे प्रेरणास्थान नायब सुभेदार लक्ष्मण भोसलेंचे पुण्यात निधन

सिद्धार्थ लाटकर
Monday, 21 September 2020

श्री. भाेसले यांचे 39 व्या व्या वर्षी अकाली निधन झाल्याने नागझरी गावावर शोककळा पसरली आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील नायब सुभेदार लक्ष्मण वसंत भोसले यांचे आज (सोमवारी) पहाटे अल्पशा आजाराने पुण्यातील कमांड रुग्णालयात निधन झाले. नायब सुभेदार लक्ष्‍मण भोसले यांनी देश सेवेसाठी पंधरा वर्षे अविरतपणे सेवा बजावली आहे.

त्यांनी सिकंदराबाद जम्मू-काश्मीर यासह सिक्कीम, नथुलापास चीन सीमेवर आणि पुणे खडकवासला, नाशिक, देहरादून, चेन्नई याठिकाणी आणि सैनिक प्रशिक्षण केंद्रावर अत्यंत चांगली सेवा बजावली. सुभेदार लक्ष्‍मण भोसले हे मनमिळावू स्वभावाचे हाेते. नागझरी व परिसरातील शेकडो युवकांना त्यांनी सैन्यदलातील भरतीबाबत मार्गदर्शनही केले. त्यांच्या पश्चात आई ,वडील, भाऊ ,पत्नी, दोन मुले, भावजयी असा परिवार आहे.

'काडसिद्धेश्‍वर'मध्ये प्लाझ्मा थेरपीस प्रयत्न करू : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई 

श्री. भाेसले यांचे 39 व्या व्या वर्षी अकाली निधन झाल्याने नागझरी गावावर शोककळा पसरली आहे. नायब सुभेदार लक्ष्मण भोसले पार्थिव आज (साेमवार) सायंकाळी पुण्याहून नागझरी गावात येणार असुन त्यांच्यावर तेथेच अंत्यसंस्कार होणार आहेत.

कोरोनाच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी, आशा सेविकांना माधव रसायन गुटी!

कांदा निर्यातबंदीविरुद्ध 'राष्ट्रवादी' चा थाळीनाद 

सततच्या पावसामुळे माणमध्ये कांदा गेला नासून 

सह्याद्री कोविड सेंटरला 300 पीपीई किट; पी. डी. पाटील संस्थेतर्फे लाखाचा धनादेश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Laxman Bhosale Of Nagzari Died In Pune Satara News