esakal | आमचं ठरलं! भटक्‍या विमुक्त जमाती संघटनेच्या नावात करणार बदल; लक्ष्मण मानेंचा राेष
sakal

बोलून बातमी शोधा

आमचं ठरलं! भटक्‍या विमुक्त जमाती संघटनेच्या नावात करणार बदल; लक्ष्मण मानेंचा राेष

80 वर्षे इंग्रज सरकारने जन्मत:च गुन्हेगार ठरवून त्यांना गुन्हेगार बनवले होते. देशभर या कायद्याने अस्तित्वात असलेल्या जमाती, अनुसूचित जमाती किंवा अनुसूचित जाती यांच्या याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

आमचं ठरलं! भटक्‍या विमुक्त जमाती संघटनेच्या नावात करणार बदल; लक्ष्मण मानेंचा राेष

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : येथे झालेल्या भटक्‍या विमुक्त जमाती संघटनेच्या राज्य कार्यकारिणीत 31 ऑगस्टला सोलापूर येथे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजिण्याचा निर्णय झाला आहे. भटक्‍या विमुक्त जमातींची तिसरी यादी या बैठकीत फेटाळण्यात आली असून, यापुढे संघटना भटक्‍या विमुक्त या शब्दाचा वापर करणार नाही. त्यामुळे संघटनेचे नाव बदलून भारतीय आदिवासी जमाती संघम या नावाने कार्य करील. या अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रण देणार असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
 
ते म्हणाले," 1871 च्या गुन्हेगार जमाती कायद्याला 31 ऑगस्ट 2021 रोजी 150 वर्षे पूर्ण होत आहेत. हा कायदा 1952 मध्ये दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर त्याचे रुपांतर संशयित गुन्हेगारी जमाती कायद्यामध्ये करण्यात आले. हा कायदा संपूर्ण देशासाठी होता. देशभर गुन्हेगारी जमातीच्या वसाहती केल्या होत्या. तीन तारांच्या कंपाउंडमध्ये या चिन्हांकित जमाती डांबण्यात आल्या होत्या. म्हणजेच खुल्या कारागृहात ठेवण्यात आल्या होत्या. 80 वर्षे इंग्रज सरकारने जन्मत:च गुन्हेगार ठरवून त्यांना गुन्हेगार बनवले होते. देशभर या कायद्याने अस्तित्वात असलेल्या जमाती, अनुसूचित जमाती किंवा अनुसूचित जाती यांच्या याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि तमिळनाडूमध्ये मात्र तिसरी सूची करण्यात आली आहे.''

पद मिळाले की लेटरपॅड, व्हिजिटिंग कार्ड छापण्यापुरते मर्यादित राहू नका

श्री. माने म्हणाले," 31 ऑगस्टला सोलापूर येथे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजिण्यात आले आहे. यापुढे संघटना भटक्‍या विमुक्त या शब्दाचा वापर करणार नाही. त्यामुळे संघटनेचे नाव बदलून भारतीय आदिवासी जमाती संघम या नावाने कार्य करील. या राष्ट्रीय अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येच्युरी, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रण देण्यात येणार आहे.'' 

शेतकऱ्यांनाे! वीजबिलातील 50 टक्के सवलतीचा लाभ घ्या; महावितरणचे आवाहन

घाबरु नका, काळजी घ्या! सातारा जिल्ह्यात 34 हॉटस्पॉट; प्रशासन सतर्क

Edited By : Siddharth Latkar