
Laxman Mane
sakal
सातारा: हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदीनुसार मूळच्या भटक्या विमुक्त जमातींना अनुसूचित जमातींचा स्वतंत्र संवर्ग करून आदिवासींमध्ये समाविष्ट करा. गेल्या ५० वर्षांपासून राज्यकर्ते आमची फसवणूक करीत आले आहेत. लोकशाही मार्गाने गुरुवारी (ता. १६) आम्ही पुण्यात मोर्चा काढला. अद्यापही आमच्या मागण्यांचा विचार झालेला नाही. आगामी काळात मान्य न झाल्यास न्याय, सत्य, अहिंसा यांना तिलांजली देऊ, त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील असा सज्जड इशारा भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने यांनी येथे दिला.