esakal | आरक्षणापूर्वीच दिग्गजांचे गुडघ्याला बाशिंग; वॉर्डात 'गेमचेंजर' ठरणार रणनीती I Election
sakal

बोलून बातमी शोधा

Karad Municipal Election

वॉर्डात गेमचेंजर ठरणाऱ्यांच्या गाठीभेटी वाढवल्या आहेत.

आरक्षणापूर्वीच दिग्गजांचे गुडघ्याला बाशिंग

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : वॉर्डरचनेसह (Karad Municipal Election) त्याच्या आरक्षणाबाबत कोणत्याच अधिकृत सूचना अद्याप पालिकांच्या हाती पडलेल्या नाहीत. मात्र, तरीही अंदाजानुसार हाच माझा वॉर्ड व याच वॉर्डात माझी उमेदवारी असल्याचे गुडघ्याला बाशिंग बांधून दिग्गजांसहित नवख्यांनी शहरात चाचपणी सुरू केली आहे. वॉर्डात गेमचेंजर (Gamechanger) ठरणाऱ्यांच्या गाठीभेटी वाढवल्या आहेत.

जुन्या सहकाऱ्यांच्या घरोघरी भेटी देऊन मनधरणी करण्याचे काम सुरू आहे. वॉर्ड कसा भी होऊ दे मीच रिंगणात, असा संदेश देण्यासाठी घर टू घर इच्छुकांची सफर शहरात चर्चेची ठरते आहे. मंगळवारसह रविवार, शुक्रवार व शनिवार पेठेतील भागात होणाऱ्या गाठीभेटी, तडजोडी गतीत आल्या आहेत. अनेक दिग्गज नेते कार्यकर्त्यांना सलाम करू लागले आहेत. त्यामुळे शहरातील वातावरणाला राजकीय ज्वर चढला आहे. मंगळवार पेठेत राजकीय ज्वर अधिक आहे. दोन नेत्यांमध्ये आमने-सामने लढतीची शहरात चर्चा आहे. दोन्हीही नेत्यांनी वर्षभरापासून एकाचाही वाढदिवस चुकवला नाही. रविवार पेठेत नवख्यांची मांदियाळी आहे. भोई गल्लीत हालचालींना गती आहे. शुक्रवार पेठेत सेफ झोनमध्ये खेळणारे नेते पडद्यामागे आहेत. हद्दवाढ भागातील वातावरणातही हीट आहे.

हेही वाचा: भाजपला 'जोर का झटका'; मुंडण करत आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी

रुक्मिणीनगर परिसरातही टफ फाईटसाठी भाजपचे नेते रिंगणात येत आहेत. शिवाजी हाउसिंग सोसायटीत ग्रुप चर्चा वाढली आहे. शनिवार पेठेत पुन्हा आजी- माजी नगरसेवकांचा आमना- सामना नक्की आहे. मार्केट यार्डात बाजारपेठेत मंदी असली तरी त्या भागातील एकही नेता राजकीय संधी सोडत नाही. रस्त्याच्या कामावरून फ्लेक्सचे राजकारण तेथे गतीत आहे. आजी-माजी नगरसेवक व त्यांचे नातेवाईक चौका-चौकातील प्रत्येक ग्रुपमध्ये सहभागी होत आहेत. लोकांना काम केल्याचा दाखला सत्ताधारी देत आहेत. विरोधक काम न झाल्याने आरोप करत आहेत. सोशल माध्यमाचा त्यासाठी वापर होतो आहे. त्यामुळे वातावरण गढूळ होत आहे.

हेही वाचा: दादा, आम्हालापण 'संचालक' करा की..

दिग्गज नेत्यांच्या लढतीची चर्चा

शहरात पालिकेतील अनेक दिग्गज नेत्यांमध्ये लढत होणार असल्याचा राजकीय लोकांचा कयास आहे. त्यामुळे त्यांच्या लढतीची चर्चा आहे. त्यात मंगळवार पेठ, वाढीव हद्दीतील भाग, शनिवार पेठेतील काही वॉर्ड, सोमवार व शुक्रवार पेठेतही दिग्गज नेते लढा देण्याच्या तयारीत आहेत. काही जण अद्याप पडद्यामागे तर काहींनी खुल्या गाठीभेटींना गती दिली आहे. त्यात मंगळवार पेठ सर्वात अग्रेसर आहे.

loading image
go to top