
सातारा : मुलींचा जन्मदर वाढावा या उद्देशाने सुरू केलेल्या लेक लाडकी योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील सुमारे सहा हजार ५३३ लेकी लाडक्या झाल्या असून, त्यापैकी सर्व लेकींच्या खात्यात पाच हजार रुपयेप्रमाणे सुमारे ३ कोटी २६ लाख ६५ रुपयांची रक्कम जमा झाली आहे.