
कोळे : घारेवाडी (ता. कऱ्हाड) जवळच्या धुळोबा डोंगरात बिबट्याचे बछड्यासह आज सकाळी दर्शन झाले. तांबवेतील कोयनाकाठ ट्रेकिंग ग्रुप सदस्यांना आज ते निदर्शनास आले. ट्रेकिंगसाठी डोंगरमाथ्यावर जात असताना त्यांचा शेतात वावर आढळून आला. त्यामुळे ग्रुपच्या सदस्यांत काही काळ भीती निर्माण झाली.